अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा सोनेरी सिल्क साडीतील सुंदर आणि आकर्षक लूक सध्या चर्चेत आहे. पारंपरिक दागिने आणि मोहक हास्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावरील तिच्या या खास अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक व्यक्तिमत्त्वाने चाहत्यांना भुरळ घालणारी माधुरी दीक्षित पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या नव्या फोटोंमधील आकर्षक अंदाज आणि मोहक हास्य सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.