झी मराठी अवॉर्ड्सचा मंच कलाकारांना त्यांच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा वेगळं काहीतरी सादर करण्याची संधी देतो. यंदा मालिकांमधील या आईंच्या एकत्रित परफॉर्मन्समधून प्रेक्षकांना सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. आपल्या आवडत्या कलाकारांना एकाच मंचावर पाहण्यासाठी आणि त्यांच्या दमदार परफॉर्मन्सचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक 'झी मराठी अवॉर्ड्स 2026' या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. जितकी उत्सुकता प्रेक्षकांना या सोहळ्याची असते, तितकीच उत्सुकता कलाकारांनाही असते.