लिंब : ‘आई, मी घरी जेवायला येतोय, माझ्यासाठी भाकरी कर,’ असा फोन करून आईला जेवणाची तयारी करण्यास सांगणाऱ्या सागर हेगडे याच्यावर काळाने घाला घातला. आईच्या हातचे ज. आईच्या हातचे जेवण खाण्यासाठी आतुर असलेला सागर घरी पोहोचलाच नाही. पुणे-बंगळूर महामार्गावरील लिंबखिंड येथे अज्ञात वाहनाला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या येण्याची वाट पाहणाऱ्या आईला मात्र त्याच्या मृत्यूची दुर्दैवी बातमी ऐकण्याची वेळ आली. या घटनेने परिसर हेलावला..