सातारा : उरमोडी प्रकल्पग्रस्त वेणेखोल (ता. सातारा) या पुनर्वसित गावठाणातील ८० खातेदारांना म्हसवड (ता. माण) येथे पर्यायी जमिनी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र य. मात्र या खातेदारांनी जमिनीऐवजी रेडीरेकनर दराच्या तीनपट दर स्विकारण्यास सहमती दिली होती. शिवेंद्रराजे यांच्या पाठपुराव्यामुळे जलसंपदा विभागाने या खातेदारांच्या पुनर्वसनासाठी संपादित करावयाच्या क्षेत्राच्या २०२५-२६च्या रेडीरेकनर दराच्या तीनपट १९ कोटी ५२ लाख ०३ हजार ६८ रूपयांचे पुनर्वसन अनुदानास मंजूरी दिली..वेणेखोल येथील ८० खातेदारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता.