आटपाडी : नोकरीला लावण्यासाठी दिलेल्या पैशांच्या वादातून आणि पाटबंधारे विभागाच्या पाईपलाईन कामातील कथित निकृष्ट दर्जाबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिल्याच्या रागातून. आटपाडी) येथे एकाच कुटुंबातील तिघांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. तसेच फिर्यादीच्या अंगावर डंपर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत किसन अण्णा गोडसे (वय ४३, रा. गळवेवाडी) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे..शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गोडसे यांच्या घरासमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला.