सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी बँकेच्या १९ संचालक मंडळासाठी निवडणूक लागली आहे. अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (दि.२६) आ. सुभाष देशमुख, माजी आ. राजन पाटील, दिलीप माने, जयवंतराव जगताप, सुरेश हसापुरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी अर्ज खरेदी केले..पहिल्या दिवशी विक्रमी अर्जांची विक्री झाल्याने बँकेच्या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, एकही उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली. .