सोलापूर : पुण्याहून गावी परतत असताना टेंभुर्णी बसस्थानकात बस पकडण्याच्या प्रयत्नात बसचे चाक डाव्या पायावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान. भालचंद्र भिमराव रोकडे (वय ७०, रा. सोलापूर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. २६) सकाळी नऊच्या सुमारास सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली..रोकडे हे रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे-उमरगा बसने पंढरपूरकडे जाण्यासाठी निघाले होते. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ते टेंभुर्णी बसस्थानकात उतरले. तेथून पंढरपूरला जाण्यासाठी दुसरी बस पकडण्याचा त्यांचा विचार होता.