हरिपूर : येथील सांगली - हरिपूर रस्त्यावरील पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ऐन दुष्काळात पाणी टंचाईच्या काळात पाण्याची ही. ऐन दुष्काळात पाणी टंचाईच्या काळात पाण्याची ही नासाडी वीस-पंचवीस दिवस झाले तरी सुरूच आहे..एकीकडे शासनाकडून पाणी जपून वापरण्याचे आणि पाणी कपातीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. दुसरीकडे जलवाहिनीलाच गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.