सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकाराच्या राजकारणाबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकांचीही रंगीत तालीम पाहायला मिळत आहे. महायुतीतील घटक पक्षांनी बहुतांश मतदारसंघांत मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी आठ सोसायटी मतदारसंघांत मात्र स्थानिक राजकीय समीकरणांमुळे नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर यांच्यातील पारंपरिक संघर्ष, माणमध्ये मंत्री जयकुमार गोरे आणि त्यांचे बंधू शेखर गोरे व मनोज पोळ यांच्यातील लढत, तर फलटणमध्ये दोन निंबाळकर.