कोडोली : सातारा शहरालगतच्या विलासपूर येथील सहजीवन सोसायटी परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या तीन चोरट्यांचा प्रयत्न जागृत नागरिकांमुळे फसला. दत्त मंदिर परिसराती. दत्त मंदिर परिसरातील अपार्टमेंटमध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नातील संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे विलासपूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीची पोलिस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे..याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सहजीवन सोसायटी परिसरात शनिवारी मध्यरात्री तीन चोरटे मोटारसायकलवरुन आले.