सांगली : शहरात पूरनियंत्रण व पावसाळी पाणी निचऱ्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून राबवण्यात येणारा ५९२ कोटी रुपयांचा ‘महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रो. येत्या आठवड्याभरात संबंधित ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली जाण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत..पूर नियंत्रणासाठी राज्याला जागतिक बँकेकडून सुमारे साडेतीन हजार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातून सांगली, कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात महापालिका व जलसंपदा विभागाकडून विविध कामे केली जात आहेत.