Mercury Transit in Libra: ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाच्या तूळ राशीतील वक्री चालीचा प्रभाव पुढील ३७ दिवस काही राशींवर दिसून येऊ शकतो. या काळात ६ राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी मिळण्याचे योग असल्याचे सांगितले जाते. कोणत्या आहेत या भाग्यवान राशी, जाणून घ्या. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, वाणी, व्यापार, तर्क शक्ती आणि संवादाचा कारक मानले जाते. त्यामुळे बुधाच्या राशीतील बदलाचा परिणाम व्यक्तीच्या आर्थिक स्थितीपासून ते नोकरी-व्यवसायापर्यंत दिसून येतो.