विनु मंकड क्रिकेट स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजी, अवघ्या १७व्या वर्षी ‘रणजी कॅप’. लातूर : राजकोट व इंदौर येथे झालेल्या विनू मंकड (१९ वर्षे) क्रिकेट स्पर्धेत रण मशीन ठरलेल्या लातूरच्या एकनाथ देवडेने ९३ च्या सरासरीने धावा ठोकत महाराष्ट्राकडून उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. या जोरावर त्याची सोमवारपासून सुरु झालेल्या वरिष्ठ गटाच्या रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. कमी वयात रणजी खेळणारा तो लातूरचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.