जळगाव : कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या बेसुमार अवैध वाळू उपशावर महसूल व पोलीस प्रशासनाने रविवारी (दि.२५) मध्यरात्री संयुक्तपणे. उत्राण व करदन शिवारात राबविलेल्या या मोहिमेत अवैध वाळू वाहतूक करणारी ४ अवजड वाहने, वाहनांमधील १६ ब्रास वाळू आणि साठवून ठेवलेला ६० ब्रास वाळूचा साठा असा एकूण तब्बल ३१ लाख ५८ हजार १०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या धडक कारवाईमुळे एरंडोल परिसरातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत..