27329, 27327 येवला : भावगीते गाताना गायक प्रथमेश लघाटे, शमिका भिडे. समोर उपस्थित श्रोते, मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ आदी ‘मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमातून मराठी भावगीतांचा सुरेल आविष्कार सकाळ वृत्तसेवा येवला, ता. २६ : मराठी भावगीतांची समृद्ध परंपरा, भक्तिसंगीताचा भावस्पर्शी अनुभव आणि सुरेल गायनाची अविस्मरणीय मैफल अशा संगीतमय वातावरणात येथील रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. गायक प्रथमेश लघाटे आणि शमिका भिडे यांच्या सुमधुर स्वरांनी सजलेल्या ‘मर्मबंधातील ठेव’ या भावगीतांच्या कार्यक्रमाला येवलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.