IPL 2027 Retention Speculation: आयपीएलच्या रिटेंशनमध्ये मोठा फेरबदल होणार आहे. 10 संघांतील स्टार खेळाडूंवर रिलीज होण्याची टांगती तलवार आहे. यात अनेक दिग्गजांचा समावेश आहे. IPL 2027 च्या हंगामाआधी खेळाडूंच्या रिटेंशन आणि रिलीजबाबत चर्चांना वेग आला आहे. आगामी लिलावापूर्वी फ्रँचायझी आपल्या संघातील कोणत्या खेळाडूंना कायम ठेवणार आणि कोणाला रिलीज करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. पण १० संघातील काही खेळाडूंवर टांगती तलवार असल्याचे समोर आले आहे.