‘रामायण’ चित्रपटातील ‘मंगल रंग’ आणि ‘रावण तांडव’ या गाण्यांवरून सुरू असलेल्या वादावर संगीतकार ए.आर. रहमान यांनी अखेर मौन सोडले आहे. ट्रोलिंगचा आपल्यावर फारसा परिणाम होत नाही, असे ते म्हणाले. गाण्यांच्या निर्मितीसाठी घेतलेली मेहनत आणि प्रामाणिकपणे केलेले काम यावर त्यांनी भर दिला, तसेच प्रेक्षकांना ती आवडतील अशी आशा व्यक्त केली.