Saiee Manjrekar : महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकरची दाक्षिणात्य सुपरस्टारच्या सिनेमात वर्णी लागली आहे. सेटवरील अभिनेत्रीचा फोटो व्हायरल झाला आहे. सुप्रसिद्ध मराठी अभिनेते महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकर लवकरच राम चरणच्या सिनेमात झळकणार आहे. सई मांजरेकरचा सिनेमातील लूकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ग्लोबल स्टार राम चरणच्या आगामी पीरियड ड्रामा 'द इंडिया हाऊस'मधील अभिनेत्री सई मांजरेकरचा लूक एस्टोनियामधून समोर आला आहे, जिथं सध्या टीम शूटिंग करत आहे.