32 वर्षानंतर हा ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घाल्यासाठी येत आहे. दिवाळीमध्ये होणार प्रदर्शित. दिवाळीच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर मोठी सिनेमॅटिक टक्कर पाहायला मिळणार आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि यश यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रामायण’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच, 90 च्या दशकातील सुपरहिट अॅक्शन-ड्रामा चित्रपट ‘मोहरा’ तब्बल 32 वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.