व्हिएतनाम देशातील निसर्ग सौदर्य आणि तेथील रहाणीमान स्वस्त असल्याने भारतीयांचा ओढा अलिकडे व्हिएतनाम देशाकडे वाढला आहे. व्हिएतनाममध्ये भारताच्या १,००० ची व्हॅल्यू लाखो डोंग होते. ज्यामुळे पर्यटकांना येथे एक हजार भारतीय रुपयात अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. दक्षिण - पूर्व आशियातील सुंदर देश व्हिएतनाम भारतीय पर्यटकांचा आवडता देश आहे. हल्ली भारतीय मध्यम वर्गीय व्हिएतनाम देशाच्या पर्यटनासाठी जात आहेत.