Jalna News : दुष्काळाचा कहर ! पाण्याअभावी मोसंबीची हजार झाडे जेसीबीने उपटली. A thousand sweet lime trees uprooted by a JCB due to a lack of water अविनाश घोगरेघनसावंगी : पावसाने पाठ फिरवल्याने घनसावंगी तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा मोठा फटका खरीप पिकांसह फळबागांनाही बसत आहे. पाण्याअभावी डोळ्यांदेखत फळबागा करपून जात असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.