मालेगाव : तालुक्यातील टेहरे येथील सर्वांगीण विकास मंडळ संचालित समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बँक खात्यांतून ७० लाख ८२ हजार ६१६ रुपयांचा अपहार केल्. न्यायमूर्ती माधव जामदार यांनी हा निर्णय दिला. शैक्षणिक संस्था आणि शासकीय अनुदानाच्या निधीचा अपहार हा गंभीर गुन्हा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच अंतरिम दिलासा १५ दिवसांनी वाढवून देण्याची आरोपींची विनंतीही अमान्य केली आहे. त्यामुळे तिघांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे..