नोंदणी कागदावर परीक्षार्थीच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह, शिक्षकांनी पार पाडले सोपस्कार. Jalna News On the registration form for making illiterate adults literate सादिक शेखआन्वा : प्रौढ निरक्षरांना साक्षर करण्यासाठी शासनाच्या वतीने नवसाक्षरता अभियान राबविले जात आहे. मात्र, नवसाक्षरांची नोंदणी करून त्यांना प्रत्यक्ष शिक्षण दिले का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. रविवारी आयोजित नवसाक्षरता परीक्षेच्या पार्श्वभूमीवर काही केंद्रांवरील परिस्थितीबाबत प्रश्न निर्माण झाले असून, अभियानाची अंमलबजावणी कागदोपत्रीच सुरू आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे..