Sandeep Deshpande on Karjat Torrent Tree cutting: कर्जतमध्ये मोठ्याप्रमाणावर वृक्षतोड सुरु आहे. टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी झाडे कापली जात आहे. मनसेने या वृक्षतोडीला विरोध केला आहे. Sandeep Deshpande on Karjat Torrent Tree cutting: रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेला टोरेंट पॉवर कंपनीचा जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प हा राज्याचा हिताचा आहे, त्यामधून हजारो रोजगार निर्माण होतील, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी टीकास्त्र सोडले.