चारा टंचाई टाळण्यासाठी कुटार विक्रीवर निर्बंध.वाशीम जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे सुधारित आदेश.ॲग्रोवन वृत्तसेवावाशीम ः दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी वाशीम जिल्हा प्रशासनाने सोयाबीन आणि तूर कुटाराच्या वापरावर आणि विक्रीवर निर्बंध घातले आहेत. कुटाराची विक्री करताना पशुपालक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यासह बायोमास ब्रिकेट्स व पेलेट्स निर्मिती करणाऱ्या उद्योगांना दररोज प्राप्त होणाऱ्या कुटारापैकी किमान ५० टक्के साठा राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.