Raj Thackeray : राज ठाकरे हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. सामाजिक मुद्यांवर ते ठामपणे बोलतात. काही गोष्टी अधिकारवाणीने सांगतात. राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या याच स्वभावाचं दर्शन घडवलं. "शहर म्हणून आपण कुठली शिस्त पाळत नाही. मला वाटतं आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. एखाद्या गाडीने कुठे फिरायला जाताना, गाडी कुठे पार्क करायची, कसलाही विचार नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टिम आणली की ती खराब करायची. आज रेल्वेने लाखो प्रवासी प्रवास करतात.