टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबारानंतर बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील संपूर्ण कट, त्यामागील हेतू आणि इतर कलाकारांना धोका होता का, हे पुढील तपासातून स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील कथित हल्लेखोरांचं सुरुवातीचं लक्ष्य अभिनेता आमिर खान असल्याचा दावा पोलिसांच्या सूत्रांनी केला आहे.