२ वर्षांच्या स्वरश्री हेगडेने आपल्या अद्भूत तबला वादनाने 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले आहे. तिचा तबला वाजवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.नेटकऱ्यांकडून 'साक्षात देवीचे रूप' म्हणत भरभरून कौतुक होत आहे. या वयात बाळं साधं नीट बोलतही नाही. खेळायला आणि छोटया छोट्या गोष्टी शिकायला सुरूवात करत असतात. पण कर्नाटकातील 2 वर्षांच्या स्वर्श्री हेगडेने तबल्यावर अशी लय धरली आहे की तिची दखल थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली.