सांगली : ऊसदराचा निर्णय न घेताच साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कृष्णा सहकारी साखर. कराड आणि सांगली जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याने ऊसदर निश्चित न करताच गळीत हंगाम सुरू ठेवल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदराचा निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली होती. मात्र, कारखाना प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले.