Sangli News: सांगलीत 52 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, सहा पोलीस दलांतील सुमारे 1200 पुरुष आणि महिला खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत आपले कौशल्य दाखवणार आहेत. ॲथलेटिक्ससह 19 खेळांच्या स्पर्धा रंगणार असून, उत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक बक्षिसेही दिली जाणार आहेत. सांगलीत 5 ते 29 ऑक्टोबरदरम्यान 52 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.