पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरात १८ वर्षीय तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शनिवारी (२४ ऑक्टोबर) सायंकाळी समर्थ डेअरीसमोर ही घटना घ. मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या तरुणीशी गैरवर्तन करून तिला जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरुणीच्या प्रसंगावधानामुळे आणि नागरिकांच्या तत्परतेमुळे ही घटना टळली..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी आरोपीने तिच्याशी गैरवर्तन करत तिचा शर्ट ओढून तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला.