खेड : तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या भोजन व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्य ठेकेदाराकडून पैसे मिळत नसल्याने सब ठेकेदाराने भोजन पुरवठ. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या भोजन व्यवस्थेतच व्यत्यय आल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय झाली..रुग्णालयातील भोजन पुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या सब ठेकेदाराला मुख्य ठेकेदाराकडून देय रक्कम मिळालेली नसल्याने हा प्रकार घडल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. संबंधित ठेकेदाराची शासनाकडे चार महिन्यांहून अधिक काळाची बिले थकीत असल्याची माहितीही समोर आली आहे.