रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सुरू असलेल्या अवैध एलईडी प्रकाशातील मासेमारीविरोधात कारवाई करण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ. सहाय्यक आयुक्त महेश देवरे आणि उपायुक्त नागनाथ भादुले यांनी कारवाईत कोणतीही शिथिलता न ठेवता नियमित गस्त घालण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार कारवाईची तयारी करण्यासाठी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांची रविवारी दिवसभर धावपळ सुरू होती..जिल्ह्यात गस्तीसाठी आवश्यक असलेली ‘रामभद्रा’ नौका अद्याप उपलब्ध नसल्याने कारवाईसाठी खासगी नौका मिळवण्याचे प्रयत्न विभागाकडून सुरू होते.