राजापूर : तालुक्यातील रापाटण येथे वैशाली शांताराम शेट्ये (वय ६८) या वृद्ध महिलेचा राहत्या घरी खून होऊन वर्ष उलटले तरी हत्येचा उलगडा झालेला नाही. आईच्या हत्येला. आईच्या हत्येला जबाबदार असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा व्हावी, यासाठी त्यांच्या मुलीने आता जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. जानवी जयेश पाथरे (माहेरचे नाव रूपाली शेट्ये) यांनी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी तक्रार दाखल करून तपासाच्या प्रगतीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत..