पुणे: नवरात्रोत्सव संपल्यानंतर पुणेकरांचा कल पुन्हा मांसाहाराकडे वाढल्याने मासळी, मटण आणि चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे सर्व प्रकारच्या मासळीच. वाढत्या मागणीमुळे सर्व प्रकारच्या मासळीच्या भावात १० टक्क्यांनी, तर मटणाच्या दरात किलोमागे ४० रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, मागणी वाढूनही चिकनचे दर स्थिर आहेत. अंड्यांच्या बाजारातही दरवाढीचे चित्र असून, इंग्लिश अंड्यांच्या घाऊक भावात शेकड्यामागे ३० रुपयांची वाढ झाली आहे. .