जर तुम्ही देखील वाढत्या पेट्रोलच्या किंमतीमुळे सीएनजी बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बाईक तुमच्यासाठी ठरू शकते फायदेशीर. 1.36 रुपयांमध्ये 1 किमी अंतर पार करते. किंमत देखील खूपच कमी. पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे सध्या सीएनजी वाहनांची मागणी वाढत आहे. कमी खर्चात जास्त अंतर पार करण्यासाठी Bajaj Freedom 125 CNG बाईक हा पर्याय ग्राहकांसाठी चर्चेत आहे. या बाईकमध्ये पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही इंधनांचा वापर करता येतो.