बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री असिन थोट्टुमकल सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली, तरी तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा कायम असते. मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांच्याशी लग्न केल्यानंतर असिनने मनोरंजनविश्वापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. आता ती आपला बहुतांश वेळ कुटुंबासाठी आणि मुलीच्या संगोपनासाठी देत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत राहुल शर्मा यांनी मुलगी अरिनच्या संगोपनाबाबत काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.