Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हा खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्रातील जनतेसह देशाचं या खटल्याच्या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे. या खटल्याच्या सुनावणीत ठाकरे गटाचा युक्तीवाद संपला आहे. याकडे महाराष्ट्रातील तमाम जनतेचं लक्ष लागलं आहे. ऑगस्ट महिन्यापासून या खटल्याची नियमित सुनावणी सुरु झाली होती. पण सध्या सुनावणीला ब्रेक लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' निवडणूक चिन्ह खटल्याची सुनावणी दिवाळीनंतर होणार आहे.