कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळची अध्यक्ष निवडीची बैठक कोरमअभावी तहकूब झाल्यास गोकळची अध्यक्ष निवडही कायद्याच्या कचाट्यात सापडण्. अध्यक्ष निवड बैठकीच्या कोरमवरून मतमतांतरे दिसून येत आहेत. त्यामुळे महायुतीचे संचालक अनुपस्थित राहिले अन् बैठक तहकूब झाल्यास समविचारी आघाडी न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. महायुतीचे संचालक सकारात्मक भूमिका घेतील असे चित्र असले, तरी यासंदर्भात महायुतीच्या २८ ऑक्टोबरला बैठकीत ठरणार्या भूमिकेवर अध्यक्ष निवडीसंदर्भातील पुढील दिशा ठरणार आहे. .