कोल्हापूर : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड. याचा कोल्हापूर विभागातील २९ तालुक्यांतील विद्यार्थांना फायदा होणार आहे. .राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. ही सवलत शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित तसेच स्वयंअर्थसहाय्यित संस्थांमधील विद्यार्थ्यांना लागू आहे. पुनर्परीक्षार्थी आणि बहिःस्थ विद्यार्थ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.