कोल्हापूर : काळम्मावाडी योजनेच्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवर आयसोलेटर बसविण्याचे काम सोमवारी व मंगळवारी केले जाणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत काळम्मावाडी योजन. त्यामुळे या दोन दिवसांत काळम्मावाडी योजनेचा वीजपुरवठा बंद राहणार असून शहराचा नियमित पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. .बुधवारीही काही भागांत अपुरा व कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी येथील पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे.