देवापूर : माण तालुक्यात दुष्काळाचे प्रखर चटके बसू लागले असून, त्याचा शेती आणि रोजगारावर गंभीर परिणाम होत आहे. पावसाअभावी खरीप हंगाम हातचा गेला असून रब्बीच्या पे. पावसाअभावी खरीप हंगाम हातचा गेला असून रब्बीच्या पेरणीची आशाही मावळली आहे. शेतीतून उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी झाल्याने स्थानिक रोजगाराचे पर्यायही संपुष्टात आले आहेत. परिणामी, उदरनिर्वाहासाठी हजारो कुटुंबांनी मुलाबाळांसह ऊसतोडीसाठी स्थलांतराचा मार्ग स्वीकारला आहे..माण तालुक्यात सध्या ३५ गावे आणि २१६ वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.