Shadab Khan : पाकिस्तानचा खेळाडू शादाब खान यानं शतकी खेळी करत पाकिस्तानला तिरंगी मालिकेत इंग्लंडवर अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. . पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात तिरंगी मालिका सुरु आहे. या मालिकेत पाकिस्तान आणि इंग्लंड आमने सामने आले होते. इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 241 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना शादाब खान यानं शतकी खेळी करत पाकिस्तानला पराभवाच्या संकटातून बाहेर काढत विजय मिळवून दिला.