Harmanpreet Kaur Century : भारतीय महिला संघाची माजी कर्णधार हरमनप्रीत कौर हिने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत शतक झळकावत दमदार पुनरागमन केलं आहे. तिने वादळी शतक झळकावलं आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या महिला वनडे सामन्यात हरमनप्रीत कौरने 121 चेंडूंत 126 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 15 चौकार मारले आणि वनडे कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले आहे. या शतकासह हरमनप्रीतने मिताली राजला मागे टाकले आहे.