प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेकडून चाकांची नियमित तपासणी आणि देखभाल केली जाते. या प्रक्रियेत चाकांचा आकार, जाडी आणि झीज तपासली जाते. भारतात रोज कोट्यवधी लोक ट्रेनने प्रवास करतात. विशेष म्हणजे रेल्वे अपघाताची प्रकरण फारच दुर्मिळ आहेत. त्यामुळेच रेल्वेतील प्रवास हा सुरक्षित मानला जातो. याच सुरक्षित रेल्वे प्रवासात रेल्वेची लोखंडी चाकं महत्त्वाची भूमिका बजावतात. कित्येक वर्षे फिरत असूनही कोणताही अपघात न होऊ देता रेल्वेला धावतं ठेवण्याचं काम करतात.