जळगावच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी संपर्कप्रमुख निलेश पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील आणि स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि मतभेदांमुळे वर्षभरापूर्वी निलेश पाटील यांनी संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शिवसेनेत असताना आपल्याला चुकीची वागणूक मिळाली आणि अन्याय झाला, असा आरोप त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केला आहे.