Farming Crisis : सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने रब्बी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेवर करता आली नाहीत. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ५ टक्केच रब्बी पेरण्या झाल्या आहेत. .कृषी विभागाच्या २१ ऑक्टोबर २०२६ अखेरच्या अहवालानुसार, जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख १३ हजार २१० हेक्टर आहे. त्यापैकी आजअखेर केवळ १० हजार ६०४ हेक्टरवर म्हणजेच अवघ्या ५ टक्के क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत..