छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गिधाडा परिसरात पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने कपाशी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली होती. या पिकासाठी शेतकऱ्यांनी एकरी 30 ते 40 हजार रुपये खर्च केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गेल्या 3 महिन्यांपासून पाऊस नसल्याने कपाशीचे पीक पूर्णपणे वाळून गेले आहे. एका झाडाला केवळ 2 ते 3 बोंडे लागल्याने उत्पादनातून लागवडीचा खर्चही भरून निघेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.