दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांचे पाणी आणि रोजगाराच्या शोधात स्थलांतर.. यावर्षी पडलेल्या कोरड्या दुष्काळाचं ग्रामीण भागात भयान वास्तव पाहायला मिळत आहे. गावागावात पाणीटंच निर्माण झाली असून, हाताला काम नसल्याने रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील नागरिकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली आहे. रस्त्यावर अनेक वाहनांमधून हे नागरिक दुसऱ्या ठिकाणी रोजगाराच्या शोधात स्थलांतर करतांना पाहायला मिळत असून, अशाच एका वाहनातील आठ कुटुंब रोजगाराच्या आणि पाण्याच्या शोधात स्थलांतर करत असतांना परभणीतील जिंतूर राज्यमहार्गावर बघायला मिळाली.