चाकूर : तालुक्यातील बेलगाव येथे वीज वितरण यंत्रणेतील बिघाडामुळे ऊस जळून खाक झाला असून, शेतकऱ्यांचे सुमारे साडेचार लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना रविवारी (द. २५) दुपारी घडली..मिळालेल्या माहितीनुसार, बेलगाव येथील डीपीजवळ झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अशोकराव वाकळे पाटील यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला. तसेच या आगीत किशनराव वाकळे पाटील यांच्या शेतातील उसाचेही मोठे नुकसान झाले आहे..शेतकऱ्यांनी वर्षभर अपार मेहनत आणि मोठी आर्थिक गुंतवणूक करून ऊसपीक जोपासले होते.